नांदगाव बीच पर्यटन सामाजिक संस्था या संस्थेची स्थापना नांदगाव गावातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने झाली या संघटनेच्या माध्यमातून गावातील पर्यटनाला देश पातळीवर नेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असतात संस्थेमार्फत गावातील समुद्राला जोडणारे रस्ते स्वच्छ करणे नांदगाव समुद्र स्वच्छ ठेवणे पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करणे तसेच गावातील सामाजिक कार्याला हातभार लावणे अशी कामे संस्थेमार्फत राबवली जातात संस्थेमार्फत संस्थेच्या सदस्यांना पर्यटन विश्वातील विविध घडामोडींचे माहिती देण्याचे कामही केले जाते तसेच पर्यटन व्यवसाय करीत असताना येणाऱ्या अडीअडचणींचे निरसन करण्यासाठी ही नांदगाव पर्यटन बीच सामाजिक संस्था आपला हातभार लावीत असते
नांदगाव गावात विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला असून या किनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा कायम कमी गर्दीचा व सुरक्षित असा समुद्रकिनारा आहे त्यामुळे ज्या पर्यटकांना गर्दी विरहित समुद्रकिनारा व शांतता प्रिय असते अशा पर्यटकांसाठी नांदगाव समुद्रकिनारा पसंतीचे ठिकाण बनत आहे या नांदगाव गावात श्री सिद्धिविनायकाचे भव्य असे मंदिर आहे तसेच श्री शंकराचे मंदिर श्री मारुतीचे मंदिर अशी विविध मंदिरे गावात पहावयास मिळतात नांदगाव गावात पर्यटकांना त्यांच्या बजेट प्रमाणे अनेक होम स्टे रिसॉर्ट कॉटेजेस असे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत तसेच गावामध्ये शुद्ध शाकाहारी खानावळ व मांसाहार प्रिया असणाऱ्या पर्यटकांसाठी असंख्य पर्याय उपलब्ध आहे
नांदगाव गावाशेजारीच उत्तरेला प्रसिद्ध असा काशीदचा समुद्रकिनारा आहे या समुद्रकिनारी पर्यटकांची नेहमी वर्दळ पाहायला मिळते या किनाऱ्यावर अनेक साहसी समुद्री खेळांचा आनंद घेता येतो, तसेच नांदगावच्या दक्षिणेस प्रसिद्ध असा मुरुडचा समुद्रकिनारा असून संध्याकाळच्या वेळी येथे कायम पर्यटकांची वर्दळ असते मुरुडच्या किनाऱ्यावरून अरबी समुद्रात असलेला पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला पर्यटकांचे स्वागत करत असतो तर थोडेच पुढे असलेला जंजिरा किल्ला हे देखील पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे मुरुडच्या मासळी बाजारात अनेक सुक्या व ओल्या माशांचे प्रकार पाहायला मिळतात येथील वाल चिंच मसाले पापड खूप प्रसिद्ध आहे
Mr.Mahesh Mapgaonkar
President
Mr.Swapneel Chavan
Vice President
Mr.Tushar Divekar
Secretary
Mr.Pratik Dalavi
Vice Secretary
Mr.Siddhesh Chaulkar
Treasurer